मेट्रोमोनियल साईटवर नाव झळकल्याने अभिनेत्री वीणा जगतापचा तिळपापड ; म्हणाली...

वीणाने ही गोष्ट स्टोरीवर शेअर केली असून तिच्या फॅन्सने देखील ही स्टोरी शेअर केली आहे
मेट्रोमोनियल साईटवर नाव झळकल्याने अभिनेत्री वीणा जगतापचा तिळपापड ; म्हणाली...

'राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळुबाई' या मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री वीणा जगतापचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉस मराठी २ मध्ये देखील वीणा सहभागी झाली होती. वीणा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यमुळे देखील चर्चेत असते. बिग बॉसमध्ये असताना वीणा आणि शिव ठाकरे यांच्यात प्रेम जुळले होते. वीणा ही शिव ठाकरेची गर्लफ्रेंड असल्याचं देखील बोललं जातं होतं. मात्र, त्यांच प्रेम फार काळ टिकू शकलं नाही.

नुकतीच वीणाच्या आयुष्यात एक गोष्ट घडली आहे. तीच नाव मॅट्रीमोनीयल साईटवर झळकलं आहे. याविषयी सांगताना ती म्हणाली की, माझा फॅन असणाऱ्या एका दादानं हा स्क्रिनशॉट मला पाठवला आहे. लोक असं का करतात मला खरंच कळत नाही. मॅट्रिमोनियल साईटवर खोटी माहिती. मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल असल्याची मलाही कल्पना नाही, असं तिने म्हटलं आहे.

याविषयी बोलताना वीणा पुढे म्हणाली की, केवळ मेट्रोमोनियल साईटवर नाही तर अशा अनेक गोष्टी मी मागील वर्षीसुद्धा एकल्या होत्या. हे प्रोफाईल बनवणाऱ्याच्या हिंमतीचा दाद द्यावीशी वाटते. अशा खोट्या प्रोफाईलपासून सावध रहा, असं आवाहन वीणाने केलं आहे. वीणाने ही गोष्ट स्टोरीवर शेअर केली असून तिच्या फॅन्सने देखील ही स्टोरी शेअर केली आहे. अभिनेत्रींचा फोटो सर्रास शेअर केला जातो. अगदी परवानगी न घेता हे फोटो शेअर केले जातात. वीणाच्या बाबतीत देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे.

logo
marathi.freepressjournal.in