घर भी तेरा, सिर भी तेरा...

'आदिपुरुष'च्या लेखक-दिग्दर्शकाला मिळाली जीवे मारण्याची धमकी
घर भी तेरा, सिर भी तेरा...

'आदिपुरुष' चित्रपटावरील वाद-विवाद थांबण्याचं नाव घेत नाहीएत. चित्रपट आता पुन्हा नव्या वादात अडकलाय. या चित्रपटामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या असून प्रभू श्रीराम, सीता,हनुमान या दैवतांना आणि रामायणाला चुकीच्या प्रकारे दाखवलं गेलं अशी तक्रार अनेक लोकं करत आहेत. यात भर म्हणजे आता चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

मध्यप्रदेशातील क्षत्रिय करणी सेनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी पत्रकार परिषद घेऊन असे सांगितले की, '' चित्रपटाच्या ट्रेलर च्या वेळीच आम्ही विरोध दर्शवला होता, तरीही आदिपुरुष प्रदर्शित झालाच कसा?''

क्षत्रिय करणी सेनेचे इंदल सिंह राणा म्हणाले,'' शहर भी तेरा, घर भी तेरा, सर भी तेरा और जूता रहेगा करणी सेना का. बहुत जल्दी हम इसका हिसाब करेंगे.''

एवढंच नाही तर त्यांनी मुंबईत देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना विरोध दर्शवायला सांगितले आहे आणि दिग्दर्शक आणि लेखक यांना शोधायला सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in