१७ फेब्रुवारीला अभिनेता अनिल कपूर व आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भूमिका असलेली ‘द नाईट मॅनेजर’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून दोघांच्याही अभिनयाची प्रशंसा करण्यात आली आहे. ही वेबसिरीज इंग्रजी वेब सिरीजचा अधिकृत रिमेक आहे. यामध्ये प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉम हिडलस्टनने प्रमुख भूमिका केली होती. तसेच, हिंदीमध्ये त्याची भूमिका आदित्य रॉय कपूरने साकारली आहे.
अशामध्ये टॉम हिडलस्टनने स्वतः आदित्य रॉय कपूरला व्हिडीओ कॉल केला होता. अभिनेत्याने फोटो शेअर करत याबाबत त्याच्या सोशल मीडियावरुन माहिती दिली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "ओरिजनल नाईट मॅनेजरने काल आमची वेबसीरिज पाहिली. त्याने या वेब सीरिजचे कौतुकही केले. अजून काय पाहिजे?" टॉम हा हॉलिवूडमध्ये खूप मोठा अभिनेता असून मार्वलच्या चित्रपटांमध्ये 'लोकी'ची भूमिका साकारतो. तसेच, त्याने अनेक हॉलिवूड सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.