बिग बॉसनंतर प्रसाद जवादे झाला लव्हगुरु!

बिग बॉसनंतर प्रसाद जवादे झाला लव्हगुरु!

आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रसाद पुन्हा भेटीला

बिग बॉस मराठी सिझन चौथामध्ये ज्या कलाकाराला प्रेक्षकांडून भरभरून प्रेम मिळाले तो म्हणजे प्रसाद जवादे. बिग बॉसनंतर प्रसाद जवादे कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर प्रसाद जवादे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर नव्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे.

कलर्स मराठीवर 'काव्यांजली - सखी सावली' हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना दोन बहिणींची प्रेमळ गोष्ट बघायला मिळणार आहे. या मालिकेत प्रसाद जवादे प्रीतम या भूमिकेत दिसणार आहे. प्रीतम एक आर जे आहे, इंफ्लूएंजर, जो लव्हगुरू आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला, “बिग बॉस मराठीमध्ये मला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं ते मी कधीच विसरु शकणार नाही. खरंतर या प्रेमाची परतफेड करताच येणार नाही. पण मी खूप विचार केला की, ह्याचं एक रिटर्न गिफ्ट मी प्रेक्षकांना कसा देउ शकतो. आणि तेव्हाच मला कलर्स मराठीकडून 'काव्यांजली - सखी सावली' या मलिकेसाठी प्रीतमच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. प्रीतम या पात्राबद्दल ऐकताच मी ठरवलं की हेच असेल माझ्या चाहत्यांसाठी एक छान रिटर्न गिफ्ट. काव्यांजली मालिकेद्वारे मी प्रेक्षकांना रोज भेटू शकतो, त्यांचं प्रेम अनुभवू शकतो. प्रीतमच्या भूमिकेचे पैलू लक्षात घेता, मला हे या मालिकेतील एक प्रभावशाली पात्र वाटतं. प्रीतम हा एक इंफ्लूएंजर आहे, त्याला प्रेमाविषयीचे लोकांचे प्रश्न सोडवणं, कविता करणं, त्याचं त्याच्या आईवर असलेलं अमाप प्रेम, आजच्‍या काळनुसार विचार करणं, असे प्रीतमचे पैलू लोकांसमोर सादर करणं माझ्यासाठी एक खूप मोठं आव्हान आहे. सर्वांना आवडणारा, लोकांच्या मनात घर करणारा, असा हा प्रीतम लवकरच तुमच्या भेटीला येतोय.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in