
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या ही चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतेच, आराध्याने एका युट्यूब चॅनलविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या युट्यूब चॅनलवर आराध्याच्या तब्येतीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर याबाबतीत चांगलीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही युट्यूब चॅनल आणि आणि वेबसाईटवरून आराध्याच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात असून अशा युट्यूब चॅनेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. दरम्यान, प्रसिद्ध स्टारकिड म्हणून सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा असते. मात्र, अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोलदेखील केले जाते. अनेक सोहळ्यांमध्ये ती आपल्या आईसोबत म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन दिसून येते. नुकतेच, अनंत अंबानी यांच्या साखरपुड्यामध्ये तिने आईसोबत हजेरी लावली होती.