अध्यक्षीय भाषणाची रंगीत तालीम!

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाट्य संमेलन म्हटलं की, नाट्य परिषदेच्या अध्यक्षाच्या भाषणाकडे जास्त लक्ष असतं.
अध्यक्षीय भाषणाची रंगीत तालीम!

संजय कुळकर्णी

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाट्य संमेलन म्हटलं की, नाट्य परिषदेच्या अध्यक्षाच्या भाषणाकडे जास्त लक्ष असतं. कारण संमेलनास राजकीय पुढारी आणि सत्तेत असलेले सत्ताधारी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलेले असतात. त्यांच्यापुढे नाट्य परिषदेच्या फंडासाठी त्यांना गाऱ्हाणं हे घालावंच लागतं. ही प्रथा पूर्वापार चालतं आलेली आहे. मच्छिंद्र कांबळी यांच्या जमान्यात त्याला एक मजा होती. मालवणी भाषेच्या लहेजात ते भाषण करायचे आणि त्यात गाऱ्हाणं सुद्धा असायचं. जे हवंय ते पदरात पडून घेतं असतं. अध्यक्षांचे भाषण हे करमणूक करणारे असायचे आणि आजही तसेच आहे. संमेलनाचा प्रमुख पाहुणा नाट्य संमेलनाध्यक्ष असला, तरी संमेलनात त्यांचे सर्वात शेवटी अध्यक्षीय भाषण असल्यामुळे प्रेक्षकांना त्यात थोड्याफार प्रमाणात इंटरेस्ट हा नसतो हे अनुभवावरून बोलतोय. अध्यक्षांना तसा भाषणासाठी वेळ हा अपुरा पडतो. पण कोणालाही त्याचे सोयरसुतक नसते. तर सांगायचा मुद्दा हा की, नाट्य परिषदेच्या अध्यक्षांच्या भाषणाकडे रंगकर्मी अगदी डोळे लावून बसलेले असतात.

यंदाच्या १०० व्या नाट्य संमेलनात नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांना प्रथमच संमेलनात अध्यक्षीय भाषण करायचं आहे. जसे अभिनेत्याला नवीन नाटकात भूमिका करण्यासाठी तालमीची आवश्यकता असते. तसेच प्रशांत दामले यांचं यंदा झालं असेल. कारण, सांगली येथे नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवताना त्यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष या नात्याने भाषण केले तीच बहुदा त्यांची रंगीत तालीम असावी. त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच मुळी त्या नोटवर केली, ते म्हणाले, "गेली ४० वर्ष मी पाठ केलेले संवाद बोलतोय. आज मात्र मला उत्स्फूर्त माझे संवाद बोलावे लागताहेत. अजित भुरे यांनी मला पुढं केलंय. खरं सांगू का आम्ही खूप भाग्यवान आहोत. कारण आमच्या पाठीमागे ५ मोठी माणसं आहेत. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आमचे विश्वस्त उदय सामंत आणि त्यात विश्वस्त अध्यक्ष शरद पवार ही मोठी मंडळी. हे सर्व नाटकवेडे आहेत. मुख्य म्हणजे ते नाट्य रसिक आहेत. त्यामुळे आम्हाला काय हवंय नकोय हे त्यांना माहित आहे. शासनाला नाट्यगृह बांधावयाची आहेत, हे काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक मंत्री यांनी जाहीर केलंय त्याबद्दल आम्ही सर्व रंगकर्मी त्यांचे आभार मानतो."

"आम्हाला आनंद सुद्धा झालेला आहे. एक रंगकर्मी म्हणून सांगावंसं वाटतं की, गेल्या चाळीस वर्षांत इतकी नाट्यगृह पाहिलेली आहेत की, नाट्यगृह उत्तम असून, सुद्धा त्याची देखभाल नीट झालेली नाही. नाट्य परिषद आणि वैयक्त्तिक मी सहकार्य देण्यास तयार आहे. फक्त त्याची देखभाल कशी राखता येईल, याकडे प्रामुख्याने लक्ष देणं जरुरीचं आहे. सांस्कृतिक संचालनाच्या यंत्रणेची काम करण्याची इच्छा आहे, पण अडचणी खूप आहेत. १००वे नाट्य संमेलन उत्तमरित्या पार पाडण्याची जबाबदारी आमच्या ६० जणांच्या टीमने शिरावर घेतलेली आहे. नाटक कसं असावं हा एक वेगळा विषय आहे. व्यावसायिक नाटक चांगलं की, प्रायोगिक नाटक चांगलं? हा देखीलं एक वेगळा विषय आहे. नाटक आवडतं की नाही आवडतं हाच महत्वाचा विषय आहे. जसं आपल्याकडे दिवाळी असते, गुढीपाडवा असतो, तसं हे नाट्य संमेलन आहे. काम करताना हवंय ते घडायला हवं असं माझं वैयक्तिक मत आहे. आमची गँग या नाट्य संमेलनासाठी १४ -१४ तास १६ -१६ तास काम करतेय. मला सुद्धा पहिल्यांदाच समजलं की एवढं काम असतं. अहो एखादं लग्न परवडलं. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळताहेत. नाटकातील मंडळी कधीही एकत्र येऊ शकत नाही संमेलनाच्या निमित्ताने तरी एकत्र येतो." प्रशांत बोलत होता. हेचं तर त्याचं शंभराव्या नाट्य संमेलनाचे नाट्य परिषदेच्या अध्यक्षांचे भाषण नसेल कशावरून? अहो हीच तर प्रशांतच्या भाषणाची रंगीत तालीम होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in