"दिल और सिटीझनशीप दोनोही हिंदुस्थानी", स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारचा चाहत्यांना सुखद धक्का

अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व असल्याने अनेकदा त्याच्या भुमिकांवर प्रश्न उपस्थित केले जात होते.
"दिल और सिटीझनशीप दोनोही हिंदुस्थानी", स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारचा चाहत्यांना सुखद धक्का

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वावरुन मोठा टीकेला सामोरं जाव लागत होतं. मात्र, आता देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचं अवचित्य साधून अक्षय कुमारने त्यांच्या चाहत्यांना आणि त्याला ट्रोल करणाऱ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व सोडलं असून आता तो भारताचा नागरिक झाला आहे.पही अक्षयने आपल्या शोशल मीडियी हँडलवरुन आपलं भारतीय असण्याचं प्रमाणपत्र सोडलं आहे. यावेळी त्याने "दिल और सिटीझनशीपही हिंदुस्थानी" असल्याचे अक्षयने म्हटलं आहे.

अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व असल्याने अनेकदा त्याच्या भुमिकांवर प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, आता भारतच माझ सर्वस्व असून पासपोर्टमध्ये बदल करण्यासाठी अर्ज केला असल्याचं अक्षय यापूर्वीच म्हणाला होता. जेव्हा लोक आपल्याला कॅनडाचं नागरिकत्व घेण्यामागील कारण न समजून घेतला बोलतात तेव्हा वाईट वाटतं, असं अक्षने एका मुलाखतीत म्हटलं होतं. यावेळी त्याने कनडाचं नागरिकत्व स्वीकारल्याचंही स्पष्ट केलं होतं.

९० च्या दशकात अक्षयचे सिनेमे चालत नव्हते. त्यामुळे त्याने कॅनडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता असं अक्षयने सांगितलं. मी कामानिमित्त कॅनडाला गेलो होतो. मात्र, यानंतर आपले दोन सिनेमे प्रकाशित झाले आणि नशिबाने ते सुपरहीट ठरले. असं त्याने सांगितलं. आता अक्षने भारतीय नागरिकत्व शेअर करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिल और सिटीझनशीप दोनोही हिंदुस्थानी...जय हिंद...असं अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्याने त्याच्या भारतीय नागरिकत्वाच्या प्रमाणपत्राचा फोटो देखील शेअर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in