Akshay Kumar Voting: या वर्षी अक्षय कुमारने प्रथमच मतदान केले, म्हणाला, "माझा देश विकसित झाला पाहिजे"

Loksabha Election 2024: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार याने लवकर सकाळीच मतदान केले आणि पहिल्यांदा भारतात मतदान करून कसं वाटलं हेही माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
Akshay Kumar voted for the first time
ANI

Akshay Kumar voted for the first time: देशातील मतदानाचा सगळ्यात शेवटचा टप्पा आज २० मे रोजी सुरु झाला आहे. सकाळपासूनच मतदार मतदानासाठी बाहेर पडले आहेत. अनेक बॉलीवूड कलाकार त्यांच्या चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्यास सांगत आहेत. अनेकांनी कलाकारांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावून आपला हक्क बजावला आहे. यामध्ये अक्षय कुमार, फरहान अख्तर, राजकुमार राव आणि जान्हवी कपूर सकाळीच मतदान केलं. यापैकी सगळ्यांचे लक्ष अक्षय कुमारकडे होते, कारण इतकी वर्षे भारतात राहूनही तो पहिल्यांदाच मतदान करत आहे.

ANI ने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अक्षय बोलताना दिसतोय की, " माझा भारत विकसित आणि सशक्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे लक्षात घेऊन मी मतदान केले. भारताने त्यांना जे योग्य वाटेल त्याला मतदान करावे....मला वाटते की मतदान चांगले होईल."

जेव्हा अक्षयला विचारण्यात आले की तो मतदान करण्यासाठी रांगेत थांबला आहे, तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिले, 'मग मी काय करू? लाइन तोडून पुढे जाऊ?'

अक्षय कुमारने भारतात पहिल्यांदाच मतदान का केले?

२०२३ मध्ये स्वातंत्र्यदिनी, अक्षय कुमारने एक घोषणा करून लोकांना आश्चर्यचकित केले होते. ही घोषणा करत त्याने सांगितले होते की त्याने कॅनडाचे नागरिकत्व सोडले आहे आणि आता तो अधिकृतपणे भारताचा नागरिक आहे. अक्षय कुमारकडे गेली अनेक वर्ष कॅनडाचे नागरिकत्व होते. अक्षयचे नागरिकत्व हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होतो आणि यामुळे अभिनेत्यावर बरीच टीकाही झाली आहे. त्याने २०१९ मध्ये भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता परंतु कोविडमुळे ही प्रक्रिया लांबली. परंतु नंतर ही प्रोसेस पूर्ण होऊन आता तो भारताचं नागरिकत्व मिळाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in