अक्षय कुमार-इमरान हाश्मीने केला मेट्रो प्रवास; त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

आगामी 'सेल्फी' चित्रपटाचा प्रमोशनसाठी अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीने मेट्रोचा केला प्रवास
अक्षय कुमार-इमरान हाश्मीने केला मेट्रो प्रवास; त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
Published on

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांनी मुंबईच्या मेट्रोमधून प्रवास केला. त्यांच्या आगामी 'सेल्फी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते दोघे मेट्रोमध्ये आले होते. या दोन्ही कलाकारांना अचानक मुंबई मेट्रोमध्ये पाहून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. बघता बघता त्यांच्या आजूबाजूला चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली.

सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी हे थेट मुंबईच्या मेट्रोमध्ये पहिल्यांदा मास्क लावून बसले. काही वेळाने प्रमोशनसाठी डान्सर्सनी प्रवेश केला, तेव्हा मेट्रोमध्ये असलेल्या प्रवाशांना समजले की, ते दोघेही तिथे उपस्थित आहेत. दोघांनीही चेहऱ्यावरील मास्क काढत मुंबईच्या मेट्रोमध्ये मैं खिलाडी तू अनारी या गाण्यावर डान्स केला. यावेळी अनेकांनी अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीसोबत सेल्फी घेतले. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा सेल्फी चित्रपट १४ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in