
खिलाडी कुमार उर्फ अक्षय कुमारची (Akshay Kumar) गणना बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. सध्या हा अभिनेता ‘सेल्फी’या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने आपण कॅनडाचे नागरिकत्व सोडणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कॅनडाच्या नागरिकत्वामुळे अक्षय कुमारला खूप ट्रोल केले जात आहे. त्याचप्रमाणे अक्षयने कॅनडाचे नागरिकत्व सोडणार असल्याचे वक्तव्य करून टीकाकारांना रोखले आहे. Aaj Tak ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला की, “भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे”.अक्षय कुमार पुढे म्हणाला, "माझ्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्याने अनेकांनी मला ट्रोल केले आहे. सत्य जाणून न घेता, लोक त्यावर प्रतिक्रिया देतात आणि ट्रोल करण्यास सुरुवात करतात. हे खूप दुःखद आहे. बॉलीवूडमध्ये माझ्या 15 चित्रपटानंतरही मला भारतीय नागरिकत्व न मिळाल्याने कॅनडाचे नागरिकत्व मिळाले होते". अक्षय कुमार पुढे म्हणाला, "माझे चित्रपट फ्लॉप होत होते. त्यामुळे माझ्या एका मित्राने मला कॅनडात येण्यास सांगितले. त्यावेळी त्याने मला कॅनडाचे नागरिकत्व मिळवून दिले. त्यानंतर मी भारतात परतलो आणि काम करू लागलो. त्यानंतर माझे अनेक चित्रपट सुपरहिट झाला. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे हे मी विसरलो होतो. पण आता मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे."