अक्षयकुमारचा 'ओमायगॉड २' या चित्रपटाची चांगलीचं चर्चा सुरु आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेता अक्षय कुमार या सिनेमात महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा या चित्रपटातील लूक व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी त्यांच कौतूक केलं आहे. तर काहींनी चित्रपटातून हिंदू धर्माची खिल्ली न उडवण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या लूक वरुन काहींनी त्याच्यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.
आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घातली असल्याची माहिती समोर आली होती. आता चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर आली आहे. अक्षयच्या 'OMG 2'या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पहाताना दिसत आहेत. मात्र, सेन्सॉर बोर्ड या चित्रपटाबाबत अतिशय काळजीपूर्वक पावले उचलताना दिसत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या रिव्हाइजिंग टीमने हा चित्रपट राहीला आहे. यावेळी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी स्वत:ही उपस्थित होते.
सेन्सॉर बोर्डाने काही दिवसांपूर्वी या चित्रपटावर तात्पूर्ती बंदी घातली होती. आता या चित्रपटातील २० सीन कट करण्याच्या सुचना निर्मात्यांना करण्यात आल्या आहेत. तसंच या चित्रपटाला अडल्ट प्रमाणपत्र देण्यात आलं असल्याचीही माहिती आहे. यामुळे १८ वर्षाखालील मुले हा चित्रपट पाहू शकत नाहीत. यामुळे अभिनेता अक्षय कुमारसह चित्रपटाच्या निर्मात्यांवर मोठं संकट कोसळलं आहे.