अक्षय कुमारचा 'OMG 2' सुसाट ; प्रेक्षकांनी केलं तोंड भरुन कौतूक

अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' आणि सनी देओलचा 'गदर 2' हे दोन्हीं चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर एकमेकांना भिडणार आहेत.
अक्षय कुमारचा 'OMG 2' सुसाट ; प्रेक्षकांनी केलं तोंड भरुन कौतूक

'ओह माय गॉड २' हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत होता. अनेक दिवसांपासुन या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. या चित्रपटातील अनेक सीन्सला सेन्सॉर बोर्डाने कात्रीदेखील लावली होती. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' हा चित्रपट अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा सगळीकडे प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा कसा आहे? या सिनेमात नक्की काय आहे? असे प्रश्न पडले होते. आज ही चित्रपट रिलीज झाल्याने प्रेक्षाकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली आहेत. अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' आणि सनी देओलचा 'गदर 2' हे दोन्हीं चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही चित्रपट हे सिक्वेल आहेत. त्यामुळे आता पहिला भाग पाहणारे प्रेक्षक या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

'ओह माय गॉड २' हा चित्रपट पाहून चाहत्यांनी आता ट्विटरवर या चित्रपटाचे रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली आहे. हा चित्रपट पाहून कसा वाटला? अश्या अनेक प्रतिक्रिया आता प्रेक्षक ट्विटरवर देत आहेत. हा चित्रपट लैंगिक शिक्षणावर आधारित असून या चित्रपटामध्ये अक्षय कुमारशिवाय पंकज त्रिपाठी, गोविंद नामदेव, यामी गौतम, अरुण गोविल असे अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. 'ओह माय गॉड 2' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने 'ए' प्रमाणपत्र दिले होते. अक्षय कुमार यासिनेमात भगवान शंकराच्या रूपात दिसत आहे. दरम्यान, 'गदर २' च्या तुलनेत या चित्रपटाला कमी स्क्रिन मिळाल्या असल्या तरी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मात्र, सकारात्मक मिळाल्या आहेत.

एका चाहत्याने चित्रपटाबद्दल आपलं मत मांडलं आहे. तो म्हणाला की, "'ओह माय गॉड २'ला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळालं आणि 'गदर 2' पेक्षा कमी स्क्रीन मिळाल्या असल्या तरीही या चित्रपटाची ताकद काही कमी झालेली नाही. त्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे. 'ओह माय गॉड २' खूप छान कामगिरी करेल." तर दुसऱ्याने लिहले आहे की, "सकाळीच 'ओह माय गॉड २' पाहिला मला त्यात 'ए' प्रमाणपत्र देण्यासारखं काही वाटलंच नाही. मुळातच ज्यांच्यासाठी हा चित्रपट बनवला आहे, त्यांनाच हा बघण्यापासून थांबवलं आहे. पण पालकांनी असा मुद्दा जरूर पहावा. जो सुपरस्टार कधीच मांडू शकत नाही. शिवाय अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचं काम मला खुप छान वाटलं आहे."

नीतू कुमार ट्विटच्या माध्यमातून अक्षय कुमारचे कौतूक करत म्हणाली की, "कधी कधी अक्षय कुमारच्या स्क्रिप्टच्या निवडीमुळे मी थक्क होत नाही. कोणताही सुपरस्टार हा 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'पॅड मॅन', 'अतरंगी रे' किंवा 'ओह माय गॉड' अशा लैंगिक शिक्षणावर आधारित चित्रपट करणार नाही. तो खरचं खुपच धाडसी कलाकार आहे आणि त्याला याचं श्रेय मिळायलाच हवं." अक्षय कुमारच्या या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना एकाने लिहलं की, "'ओह माय गॉड २' हा एक जबरदस्त चित्रपट आहे. अॅडल्ट एजुकेशनचा मुद्दा कोणीही अधिक जबाबदारीने आणि मनोरंजक पद्धतीने सांगू शकला नसता. हा सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. पंकज त्रिपाठी यांनी चमकदार कामगिरी केली आणि अक्षय आणि यामीनं तर कमाल केली आहे." एकंदरीत 'ओह माय गॉड २' ला लोकांनी सकारात्मक प्रतिक्रया दिल्या आहेत. लोकांना या चित्रपट खूप आवडला असून प्रेक्षक कलाकारांचं कौतूक करताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in