अलाया एफने तिचा आगामी चित्रपट 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'चा पोस्टर केला प्रदर्शित

अलाया एफने अनुराग कश्यप दिग्दर्शित तिचा आगामी 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले आहे.
अलाया एफने तिचा आगामी चित्रपट 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'चा पोस्टर केला प्रदर्शित
Published on

अलीकडेच, कार्तिक आर्यन अभिनित 'फ्रेडी'च्या नवीन पोस्टरमध्ये कैनाझ उर्फ ​​फ्रेडीची जुनून म्हणून अलाया एफला पाहण्यात आले. अशातच, अलायाने दर्शकांना आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. अलाया एफ ने अनुराग कश्यप दिग्दर्शित तिचा आगामी 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले आहे. या दोन मोठ्या घोषणांसह, अलाया एफ आता दर्शकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

अलीकडेच, फ्रेडीचा स्पाइन-चिलिंग रोमँटिक पोस्टर प्रदर्शित झाला असून, यामध्ये अलायाला मेल लीड कार्तिक आर्यनसोबत पाहायला मिळाले. यानंतर, माराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये अनुराग कश्यप दिग्दर्शित 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'या तिच्या आगामी चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरसाठी निघाली. आणि आता प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. एक अनोखा आणि लक्ष वेधून घेणारा 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'चा पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वाढत आहे. अशा दोन मोठ्या बॅक-टू-बॅक पोस्टर रिलीजसह, अलाया एफ तिच्या आगामी चित्रपटांसह सज्ज आहे.

तसेच, रणवीर सिंग नंतर आंतरराष्ट्रीय मारकेच फिल्म फेस्टिवल २०२२ मध्ये  तिच्या उपस्थितीसह, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करणारी अलाया एफ ही भारतातील दुसरी सेलिब्रिटी बनली आहे. दरम्यान, वर्कफ्रंटवर, अलाया एफकडे 'फ्रेडी' व्यतिरिक्त चित्रपटांची एक मनोरंजक लाइनअप आहे. 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' तसेच, एकता आर कपूर निर्मित यू-टर्न या लाइनअपमध्ये आहे.

logo
marathi.freepressjournal.in