आले रे पोस्टर बॉईज २' च्या भव्यदिव्य पोस्टरचं दादरमध्ये अनावरण

'आले रे पोश्टर बॉईज २' च्या पोस्टरमध्ये तिघे कलाकार लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. यावेळी हे बॉईज लंडनमध्ये धुमाकुळ घालणार आहेत
आले रे पोस्टर बॉईज २' च्या भव्यदिव्य पोस्टरचं दादरमध्ये अनावरण

दिलीप प्रभावळकर,हृषीकेश जोशी , अनिकेत विश्वासराव या त्रिकुटाचा धमाल कॉमेडी असलेला 'पोश्टर बॉईज' हा सिनेमा काही वर्षांपूर्वी गाजला होता. हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय मयेकर दिग्दर्शित 'आले रे पोश्टर बॉईज २' या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच ढोल ताशाच्या गजरात मुंबईत दादरमध्ये करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

'आले रे पोश्टर बॉईज २' च्या पोस्टरमध्ये तिघे कलाकार लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. यावेळी हे बॉईज लंडनमध्ये धुमाकुळ घालणार आहेत. त्यांच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये 'फुल्ल बॉडी मसाज, कॉल डॉली' असे लिहिलेले दिसत आहे, म्हणजे हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं', या उक्तीनुसार कोणाची फसवणूक होणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तळपदे, एएनडब्लू स्टुडिओज आणि विरांगना फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दिप्ती तळपदे निर्माते असून अमित भानुशाली सहनिर्माते आहेत. हितेश मोडक यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाला डॉ. सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद लाभले आहेत. पोश्टर बॉइज चा दुसरा भाग असलेला 'आले रे पोस्टर बॉईज २' सुद्धा धमाल मनोरंजन करणारा असेल अशी अशा करूया.

logo
marathi.freepressjournal.in