शिझान खानवरील सर्व आरोप बिनबुडाचे, पोलिसांकडे पुरावे नाहीत - वकील

या मालिकेच्या सेटवरील एकाही व्यक्तीने शिझानविरोधात वक्तव्य केलेले नाही.
शिझान खानवरील सर्व आरोप बिनबुडाचे, पोलिसांकडे पुरावे नाहीत - वकील

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येला शिझान खान जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान, आता पोलिसांकडे कोणतेही पुरावे नसल्यामुळे शिझानच्या वकिलांनी सर्व आरोप निराधार असल्याची माहिती दिली. शिझानच्या वकिलाने सांगितले की, "पोलीस शिझानची सतत चौकशी करत आहेत. त्याच्यावर अनेक आरोप आहेत आणि पोलिसांकडे अद्याप कोणतेही पुरावे नाहीत. सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. या मालिकेच्या सेटवरील एकाही व्यक्तीने शिझानविरोधात वक्तव्य केलेले नाही. 

वकिलाने पुढे सांगितले की, "पोलिसांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे. पोलिसांना पुरावे मिळाल्यास त्यांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. शिझानचे फक्त तुनिषासोबत संबंध होते. त्याचे इतर मुलींशी कोणतेही संबंध नव्हते. तुनिषाच्या आईने त्याच्यावर अनेक खोटे आरोप केले आहेत. अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान पोलिसांच्या ताब्यात आहे.  शिझान खानच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्याला 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in