अल्लू अर्जुन आणि अजय देवगण आमने-सामने ; एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे दोन चित्रपट

२०२४ सालच्या १५ ऑगस्टला प्रसिद्ध चंदन तस्कराचा सामना एका दमदार पोलिस अधिकाऱ्याशी होणार आहे
अल्लू अर्जुन आणि अजय देवगण आमने-सामने ;  एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे दोन चित्रपट

चित्रपटसृष्टीत सध्या सिनेमांची जत्रा पाहायला मिळत आहेत. एका पाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसर कमाल करत सुटले आहेत. या वर्षी प्रेक्षकांना सुपरहिट सिनेमांची जणू मेजवानीच मिळाली आहे. त्यात 'गदर-२', 'ओह माय गॉड-२', 'जवान', 'ड्रीम गर्ल-२' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यातचं आता असं समजतंय की लवकरचं साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगण या दोघांचे चित्रपट एकाचं दिवशी आमनेसामने येणार आहेत.

फार कमी लोकांना हे माहिती आहे की, २०२४ सालच्या १५ ऑगस्टला प्रसिद्ध चंदन तस्कराचा सामना एका दमदार पोलिस अधिकाऱ्याशी होणार आहे. पुढील वर्षी 'पुष्पा २' या चित्रपटाची टक्कर थेट 'सिंघम अगेन' या चित्रपटाशी होणार आहे. 'सिंघम अगेन' हा चित्रपट पुढच्या वर्षी याच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण सध्या त्याच्या चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे.

साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुन यानं नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात बहुचर्चित 'पुष्पा २' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा अर्धा चेहराही दिसत आहे. त्याच्या हातात आणि बोटात सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठ्या पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच त्याच्या एका नखावर लाल रंगाची नेलपेंटही दिसत आहे. एवढंच नाही तर त्याच्या बोटांवर रक्ताचे शिंतोडेही उडाल्याचं दिसत आहे.

या घोषणेनंतर 'पुष्पा २' हा अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' समोर टिकेल का? असा प्रश्न लोकांना पडला आहे. याबाबतीत सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. सध्या हिंदी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत. पण हेच दिवस पुढल्यावर्षीही पाहायला मिळणार का? आणि जर असंच असेल तर अल्लू अर्जुन पुन्हा बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचू शकणार का? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत.

अजून या दोन्ही चित्रपटांच्या तारीख बदलण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे २०२४मध्ये १५ ऑगस्टला 'पुष्पा २' आणि 'सिंघम अगेन' हे दोन चित्रपत एकमेकांन देणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in