अ‍ॅमेझॉन इंडिया आणि माहिती, प्रसारण मंत्रालयाची हातमिळवणी

अ‍ॅमेझॉन इंडिया आणि माहिती, प्रसारण मंत्रालय भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एकत्र आले
अ‍ॅमेझॉन इंडिया आणि माहिती, प्रसारण मंत्रालयाची हातमिळवणी
@ianuragthakur

भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था वाढविण्याच्या उद्देशाने अ‍ॅमेझॉन इंडियाने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत (एम.आय.बी) लेटर ऑफ एंगेजमेंट (एल.ओ.ई) वर स्वाक्षरी केली आहे. या सहकार्याचा एक भाग म्हणून अ‍ॅमेझॉन आणि एम.आय.बी भारतातील अभिनव प्रतिभेला प्रोत्साहन देता यावे म्हणून मार्ग तयार करण्यात मदत करतील, प्रख्यात चित्रपट आणि टीव्ही संस्थांमध्ये क्षमता निर्माण करतील आणि जागतिक स्तरावर मेड इन इंडिया सर्जनशील आशय प्रदर्शित करतील. भारत सरकारचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री माननीय अनुराग सिंह ठाकूर, अ‍ॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष सार्वजनिक धोरण चेतन कृष्णस्वामी आणि प्राइम व्हिडिओच्या आशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष गौरव गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील नॅशनल मीडिया सेंटर येथे या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

एल.ओ.ई चा एक भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एन.एफ.डी.सी) आणि आय.एम.डी.बी रँकिंगच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रोफाइल आणि कौशल्य-संच सूचीबद्ध करून भारताच्या सर्जनशील प्रतिभेचा शोध घेण्यास सक्षम करण्यासाठी एकत्र काम करतील. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय) आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एस.आर.एफ.टी.आय.आय) मधील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि स्कॉलरशिप देण्यासाठी प्राइम व्हिडिओ आणि मिनीटी.व्ही हे दोन्ही काम करतील. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल आणि ते उद्योगासाठी तयार होतील. आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून एन.एफ.डी.सी, दूरदर्शन आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आय.एफ.एफ.आय) मधील प्रतिष्ठित आशय प्राईम व्हिडिओ आणि मिनीटी.व्ही वर प्रदर्शित केला जाईल, ज्यामुळे भारतातील बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचेल, ज्या मुळे त्यांचा सांस्कृतिक प्रभाव वाढेल आणि त्यांची सॉफ्ट-शक्ति वाढेल. याशिवाय, विविध चित्रपट आणि टीव्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य-आधारित मास्टरक्लासेस आयोजित केले जातील आणि आय.एफ.एफ.आय च्या छत्रछायेखाली ७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो - वार्षिक प्रतिभा संवर्धन कार्यक्रम आयोजित केला जाईल, जिथे एम.आय.बी ने निवडलेल्या ७५ तरुण, प्रतिभावान कलाकारांची निवड केली जाईल आणि त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.

एम.आय.बी च्या प्रकाशन विभागाकडून भारताचा अभिमानास्पद वारसा दर्शविणारी विविध प्रकारची पुस्तके आणि नियतकालिकांना प्रोत्साहन देण्यासाठी Amazon.in एक विशेष स्टोअरफ्रंट तयार करणार आहे. प्रसार भारतीने प्रकाशित केलेले अलेक्सा ऑल इंडिया रेडिओ कौशल्य न्यूज बुलेटिन आणि शैक्षणिक आशय प्रसारित करण्यास मदत करेल. अ‍ॅमेझॉन म्युझिक आणि अॅलेक्साच्या माध्यमातून प्रसार भारतीच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संगीताची व्याप्ती वाढविण्यासही या सहकार्यामुळे मदत होणार आहे.

Amazon सोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, "Amazon India सोबतची भागीदारी अनेक बाबींवर अद्वितीय आहे आणि सर्जनशील उद्योगाच्या विविध पैलूंमध्ये सहभागाचे पत्र आहे. या भागीदारीमुळे तरतुदींद्वारे उद्योग-शैक्षणिक संबंध मजबूत करण्यात मदत होईल. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, मास्टरक्लास आणि इतर संधी आणि भारतातील प्रतिष्ठित फिल्म इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडणाऱ्या प्रतिभावान कलाकारांसाठी संघर्षाचा कालावधी कमी करण्यात मदत होईल”.

“भारतीय अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत असताना ई-कॉमर्स, लॉजिस्टिक्स, डिजिटल स्किलिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, पेमेंट्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या उभारणीसह अनेक आघाड्यांवर देशाच्या विकास प्रवासात योगदान देण्यासाठी अ‍ॅमेझॉन अनन्यसाधारण स्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही आमच्या विविध सहकार्य आणि उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्यासाठी भारत सरकार सोबत काम करत आहोत," असे अ‍ॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष पब्लिक पॉलिसी चेतन कृष्णस्वामी यांनी सांगितले. चेतन म्हणाले, "आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी संलग्नतेचे हे मैलाचा दगड असलेले लेटर ऑफ एंगेजमेंट, प्राइम व्हिडिओ, मिनीटीव्ही, अ‍ॅमेझॉन म्युझिक, अलेक्सा, आय.एम.डी.बी आणि आमच्या मार्केटप्लेस व्यवसायासारख्या आमच्या अनेक सेवांद्वारे भारताच्या सर्जनशील प्रतिभा आणि कथांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन आणि प्रदर्शन करण्यासाठी आमची वचनबद्धता मजबूत करते.

"प्राइम व्हिडिओमध्ये आम्ही नेहमीच स्वतःकडे सर्जनशील परिसंस्थेचे सक्षम म्हणून पाहिले आहे. एंटरटेनमेंट हब म्हणून प्रत्येक कथा सांगायला जागा आहे, ती तेव्हाच समृद्ध होते जेव्हा अधिक उत्कट कथाकारांना त्यांचे सर्वोत्तम कार्य पुढे आणण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, व्यासपीठ आणि संसाधने मिळतील," असे प्राइम व्हिडिओचे आशिया-पॅसिफिक उपाध्यक्ष गौरव गांधी यांनी सांगितले. आपली समृद्ध सांस्कृतिक विविधता समृद्ध सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सॉफ्ट शक्ति वाढविण्यासाठी अफाट क्षमता प्रदान करते. 'एम.आय.बी' सोबत आमचे सर्वंकष सहकार्य, उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि एकत्रीकरणाच्या प्रत्येक कोपऱ्याकडे पाहते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मार्गांबद्दल आम्ही खूप आशावादी आहोत, असे गौरव यांनी सांगितले.

प्राइम व्हिडिओ साठी प्राइम बेइ असलेला अभिनेता वरुण धवन म्हणाला, "प्राइम बेइ म्हणून, इतर कोणाच्याही आधी एम.आय.बी आणि ॲमेझॉन यांच्यातील या ऐतिहासिक सहकार्याचे साक्षीदार होताना मी उत्तेजित आहे. कुठल्याही कलावंताचं अंतिम स्वप्न असते स्वतःच्या कामासाठी ओळखले जाणे. प्राइम व्हिडिओसारख्या स्ट्रीमिंग सेवेमुळे आज जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक सुद्धा आमच्या संगीतावर नाचत आहेत आणि आमच्या संवादाचा पुनरुच्चार करत आहेत. या पद्धतीचे सहकार्य जागतिक मनोरंजन मंचावर भारतीय असणे म्हणजे काय याची पुन्हा व्याख्या करण्याच्या दिशेने कार्य करण्यास आपल्या सर्वांना मदत करते."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in