Farzi web series : शाहिद कपूर, विजय सेतुपतीची 'फर्जी' वेबसिरीज येणार 'या' तारखेला

'फर्जी'या सिरीजमधून शाहिद कपूर आणि विजय सेतुपती करणार ओटीटीविश्वात पदार्पण
Farzi web series : शाहिद कपूर, विजय सेतुपतीची 'फर्जी' वेबसिरीज येणार 'या' तारखेला

नवीन वर्षाची सुरुवात करत अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी बहुप्रतीक्षित सिरीज 'फर्जी'ची घोषणा केली आहे. ‘फॅमिली मॅन’ सारखी सुपरहिट सिरीज देणारे राज आणि डीके डी२आर फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित 'फर्जी' या सिरीजमधून बॉलीवूडचा अभिनेता शाहिद कपूर आणि साऊथचा स्टार विजय सेतुपती हे दोन्ही कलाकार डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही सिरीज १० फेब्रुवारीला भारतात आणि जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

या सिरीजमध्ये राशि खन्ना, के.के. मेनन, अभिनेते अमोल पालेकर, रेजिना कॅसॅंड्रा आणि भुवन अरोरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आठ भागांची असलेली 'फर्जी'ही अनोखी क्राईम थ्रिलर सिरीज आहे. तसेच, सिरीजमध्ये दिग्दर्शक जोडीचा ट्रेडमार्क ह्युमर पाहायला मिळणार आहे. यामध्ये श्रीमंतांची बाजू घेणार्‍या व्यवस्थेला रोखण्यासाठी एका हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टने केलेला प्रयत्न पाहायला मिळेल. त्याची आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी ही एक रोमांचक शर्यत आहे जिथे हरणे हा पर्याय नाही. अशातच, राज आणि डीके सोबत 'फर्जी' सीरिज सीता आर मेनन आणि सुमन कुमारद्वारा लिखित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in