शाहिद कपूर, विजय सेतूपतीच्या 'फर्जी'चा ट्रेलर झाला प्रदर्शित

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने प्रदर्शित केला शाहिद कपूर आणि विजय सेतूपती अभिनीत आगामी सिरीज 'फर्जी'चा रोमांचक ट्रेलर
शाहिद कपूर, विजय सेतूपतीच्या 'फर्जी'चा ट्रेलर झाला प्रदर्शित

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने आज आपल्या आगामी ओरिजिनल सीरिज 'फर्जी'चा ट्रेलर प्रदर्शित केला. तसेच, या क्राईम ड्रामा सिरीजद्वारे सुपरस्टार शाहिद कपूर आणि विजय सेतुपती ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता के. के. मेनन, राशि खन्ना, भुवन अरोरा, रेजिना कॅसांड्रा आणि अमोल पालेकर महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. ही सिरीज १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरमध्ये आपल्याला अल्पावधीमध्येच ठग बनणाऱ्या सनी (शाहिद)च्या आयुष्याची झलक पाहायला मिळते. एक तेजतरार आणि अपरंपरागत टास्क फोर्स ऑफिसर (विजय) यांनी देशाला त्याच्याकडून असलेल्या धोक्यापासून मुक्त करणे हे आपले ध्येय बनवले आहे. आठ भागांची असलेली 'फर्जी'ही अनोखी क्राईम थ्रिलर सिरीज, तीव्र आणि चपखल आहे. तसेच, शोमध्ये दिग्दर्शक जोडीचा ट्रेडमार्क ह्युमर पाहायला मिळणार आहे. यामध्ये श्रीमंतांची बाजू घेणार्‍या व्यवस्थेला रोखण्यासाठी एका हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टने केलेला प्रयत्न पाहायला मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in