Amir Khan: आगामी चित्रपट 'चॅम्पियन्स'साठी आमिर खान बनला निर्माता

आमिर खानने अलीकडेच त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमासाठी दिल्ली ला हजेरी लावली, जिथे त्यांनी 'चॅम्पियन्स' बद्दल एक अपडेट शेअर केला.
Amir Khan: आगामी चित्रपट 'चॅम्पियन्स'साठी आमिर खान बनला निर्माता

आमिर खान त्यांचा कथानद्वारा अनोखे विषय दर्शकांसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध आहे यात काही शंका नाही. अशातच, त्यांचा आगामी चित्रपट 'चॅम्पियन्स'बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे . ह्या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी सिनेप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतानाच, आता ह्या चित्रपटा संभंधित एक महत्वाचा उपडेट समोर आला आहे. अलीकडेच, आमिर खान त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमात उपस्थित होते, जिथे त्यांनी 'चॅम्पियन्स'या चित्रपटाबद्दल खुलासा केला.

आमिर खानने अलीकडेच त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या कार्यक्रमासाठी दिल्ली ला हजेरी लावली, जिथे त्यांनी 'चॅम्पियन्स' बद्दल एक अपडेट शेअर केला. आमिर खान चित्रपटाचे निर्माता बनण्याबाबत आपले मत व्यक्त करत म्हणाले, "ही एक उत्कृष्ट स्क्रिप्ट आहे, आणि एक सुंदर कथा आहे. हा एक अतिशय हृदयस्पर्शी आणि सुंदर चित्रपट आहे. पण, मला असे वाटते कि मला ब्रेक घ्यायचा आहे. मला माझ्या कुटुंबासोबत रहायचे आहे, मला माझ्या आई आणि माझ्या मुलांसोबत राहायचे आहे." ते पुढे म्हणाले, "मी 'चॅम्पियन्स'ची निर्मिती करणार आहे कारण माझा चित्रपटावर विश्वास आहे, मला वाटते की ही एक उत्कृष्ट कथा आहे." आमिर खान प्रॉडक्शन्स, सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन्स, इंडिया आणि २०० नॉटआउट प्रॉडक्शन्स या चित्रपटाची सहनिर्मिती करणार आहेत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in