तब्बल 32 वर्षांनी 'या' सिनेमात एकत्र झळकणार अमिताभ बच्चन आणि रजनीकांत

रजनीकांत अमिताभ बच्चन यांच्या सारख्या महानायकांसोबत या सिनेमात टॉलिवूड अभिनेता सुर्याची देखील झलक पाहायला मिळणार आहे.
तब्बल 32 वर्षांनी 'या' सिनेमात एकत्र झळकणार अमिताभ बच्चन आणि रजनीकांत

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दोन्ही मनोरंजसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. दोघांनीही एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. दोघांचे चाहते त्यांच्या चित्रपटांची आतूरतेने वाट पाहत असतात. या दोन्ही दिग्गजांनी गेल्या 32 वर्षांपासून एकही सिनेमा सोबत केला नाही. आता तब्बल 32 वर्षांनंतर दोन्ही महानायक एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे.

बिग बी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी आता पर्यंत 'हम', 'अंधा कानून', आणि 'गिरफ्तार' या सिनेमांमध्ये सोबत काम केलं आहे. मात्र, मागील तीन दशकं या जोडीने सोबत एकही सिनेमा केला नाही. त्यामुळे या दोन्ही दिग्गजांना पुन्हा एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते उत्सूक झाले आहेत.

'थलाईवर 170' हा रजनीकांतचा 170 वा सिनेमा आहे. याच कारणाने या सिनेमाचं नाव 'थलाईवर 170' असं ठेवण्यात आलं आहे. या सिनेमात बॉलिवूडे महानायक अमिताभ बच्चन हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार असणार असल्याचं सांगितलं जात आहे. अमिताभ बच्चन यांच्या आधी 'थलाइवर 170' या सिनेमासाठी 'पोननियिन सेल्वन' या सिनेमातील चियान विक्रम यांना विचारणा झाली होती. मात्र, आता या सिनेमात अमिताभ आणि रजनीकांत यांची जोडी दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या वर्षाच्या शेवटी या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. रजनीकांत या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. महत्वाचं म्हणजे रजनीकांत अमिताभ बच्चन यांच्या सारख्या महानायकांसोबत या सिनेमात टॉलिवूड अभिनेता सुर्याची देखील झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सिनेप्रेमींना या सिनेमाविषयी उत्सुकता लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in