बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी खासगी हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हरीश साळवे अमिताभ यांची बाजू मांडणार आहेत. न्यायमूर्ती नवीन चावला यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
आवाज, नाव आणि प्रतिमा यांच्या संरक्षणाची मागणी अमिताभ बच्चन यांनी केली आहे. बिग बींच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा विचार केला तर त्यांनी कमावलेले नाव, त्यांचा आवाज आणि समाजातील त्यांची प्रतिमा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच त्यांनी संरक्षण मागितले आहे. अमिताभ बच्चन यांच्या नावाला एक वेगळं वलय आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या नावाचा गैरवापर होत आहे. याच भावनेतून अमिताभ बच्चन यांनी हा निर्णय घेतला असावा. अमिताभ बच्चन हे अभिनयाबरोबरच त्यांच्या आवाजासाठी ओळखले जातात. अनेक जाहिराती आणि प्रमोशनमध्ये त्यांचा आवाज वापरला जातो. पण आता या गोष्टी करण्याला मर्यादा येणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कोणत्याही गोष्टीचा गैरवापर होऊ नये आणि प्रत्येक गोष्टीचे कायदेशीर संरक्षण व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे.