अमृता फडणवीस यांचा रील स्टार रियाझ अलीसोबत 'आज मूड बना लिया'

स्वत: अमृता फडणवीस यांनी रील स्टार रियाझ अलीसोबत बनवलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे
अमृता फडणवीस यांचा रील स्टार रियाझ अलीसोबत 'आज मूड बना लिया'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचे 'आज मुड बना लिया' हे गाणे रिलीज झाले. अमृता फडणवीस यांच्या पहिल्या पंजाबी गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अमृता यांनी संगीत क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवीन पंजाबी गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर अमृता यांनी रील स्टार रियाझ अलीसोबत 'आज मूड बना लिया' या गाण्यावर रील बनवली आहे.

स्वत: अमृता फडणवीस यांनी रील स्टार रियाझ अलीसोबत बनवलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अमृता यांच्या नव्या रीलची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सध्या यांच्या नवीन व्हिडिओला सोशल मीडियावर अनेक यूजर्सकडून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in