"चिऊताई चिऊताई दार उघड" : अमृता खानविलकरचे पहिलेवहिले 'आयटम साँग' रिलीज, बघा Video

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एक खास सरप्राईझ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
"चिऊताई चिऊताई दार उघड" : अमृता खानविलकरचे पहिलेवहिले 'आयटम साँग' रिलीज, बघा Video
Published on

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एक खास सरप्राईझ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमृताने तिच्या मित्र मंडळीच्या 'सुशीला-सुजीत' या सिनेमात एक खास गाणं केलं असून "चिऊताई चिऊताई दार उघड" असं या गाण्याचं नाव आहे. अमृता तिच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदा 'आयटम साँग' करणार आहे.

सुपरहिट लावण्या सादर केल्यानंतर आता अमृता या चित्रपटात पहिल्यांदाच 'आइटम साँग' करणार असून तिच्या नृत्याची पुन्हा एकदा जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुशीला- सुजीत मधील हे आइटम साँग नक्कीच काहीतरी कमाल आहे आणि नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात अमृता या गाण्यात दिसतेय. आजवर अमृताने अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्या आणि त्यातून प्रेक्षकांना मोहित केलं आहे आता अमृता या नव्या आइटम साँगमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकणार यात शंका नाही.

अमृता या गाण्यात तिच्या आवडत्या मित्रासोबत म्हणजे अभिनेता गश्मीर महाजनीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सुशीला-सुजीतमध्ये चिऊताई चिऊताई दार उघड हे गाणं नक्कीच धम्माल करून जाणार आहे असं दिसतंय. पंचशील एंटरटेनमेंट्स आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत सुशीला - सुजीत हा चित्रपट येत्या १८ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येवून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. प्रसाद ओक हा चित्रपटाचा दिग्दर्शक आहे तर संजय मेमाणे हे सिनेमॅटोग्राफर आहेत.

वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा कोणताही नृत्यप्रकार अमृता कायम तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांना मोहित करत आली आहे आणि आता पुन्हा एकदा या पहिल्यावहिल्या आयटम साँग मधून अमृता प्रेक्षकांना खिळवून ठेवणार का हे पाहावं लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in