Animal Box Office Collection: 'अ‍ॅनिमल' ठरला सर्वांवर भारी; सहाव्या दिवशी केली तब्बल 'एवढ्या' कोटींची कमाई

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
Animal Box Office Collection: 'अ‍ॅनिमल' ठरला सर्वांवर भारी; सहाव्या दिवशी केली तब्बल 'एवढ्या' कोटींची कमाई
Published on

बॉलीवूड अभिनेता रणबीर कूपरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाने सहाव्या दिवशी देखील काही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमावाला आहे. 'Sacnilk'च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी 30.00 कोटी रुपये कमवले आहेत. आता या चित्रपटाने भारतात तब्बल 300 कोटींचा टप्पा पार केला असून सहा दिवसात या चित्रपटानं 312.96 कोटींची कमाई केलेली आहे.

'अ‍ॅनिमल'ने सहा दिवसांत केलेली कमाई

  • पहिला दिवस - 63.8 कोटी

  • दुसरा दिवस - 66.27 कोटी

  • तिसरा दिवस - 71.46 कोटी

  • चौथा दिवस - 43.96 कोटी

  • पाचवा दिवस - 37.47 कोटी

  • सहावा दिवस-30.00 कोटी

भारतात आतापर्यंतची एकूण कमाई - 312.96 कोटी

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी 30 कोटींचे कलेक्शन करुन बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' तसेच 'बाहुबली 2' चा देखील रेकॉर्ड मोडला आहे. अभिनेता प्रभासच्या 'बाहुबली 2' या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी 26 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. तर शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी 25.5 कोटी कमाई केली होती. 'जवान' चित्रपटाने सहाव्या दिवशी 24 कोटींची कमाई केली होती.

'अ‍ॅनिमल'' या चित्रपटाला सेन्सॉरने 'A' सर्टिफिकेट दिलं आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'अ‍ॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर सह रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तृप्ती डिमरीने देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.

logo
marathi.freepressjournal.in