Animal OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अ‍ॅनिमल' ओटीटीवर येणार

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर रणबीरचे चाहते त्याच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. आता लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.
Animal OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अ‍ॅनिमल' ओटीटीवर येणार

बॉलीवूड अभिनेता रणबीर कूपरच्या 'अ‍ॅनिमल' या बहुचर्तित सिनेमाची सध्या सर्वत्र हवा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरसह, रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर हे दिग्गज कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर रणबीरचे चाहते त्याच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. आता लवकरच प्रेक्षकांना घर बसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 2024 च्या सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मने 'अ‍ॅनिमल'चे ओटीटी राईट्स विकत घेतले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. थिएटरमध्ये न दाखवलेले सीन ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की,"रणबीर कपूर तुमच्या डोळ्यात पाहत आहे. हीच पोस्ट आहे..तुमचं स्वागत".

'अ‍ॅनिमल'ने आतापर्यंत केलेली कमाई

  • पहिला दिवस : 63.8 कोटी

  • दुसरा दिवस : 66.27 कोटी

  • तिसरा दिवस : 71.46 कोटी

  • चौथा दिवस : 43.96 कोटी

  • पाचवा दिवस : 30.39 कोटी

  • सहावा दिवस : 24.23 कोटी

  • सातवा दिवस : 24.23 कोटी

  • आठवा दिवस : 22.95 कोटी

  • नववा दिवस : 34.74 कोटी

  • दहावा दिवस : 37 कोटी

एकूण कमाई : 432.27 कोटी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in