Animal Teaser : 'अ‍ॅनिमल'चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला ; बॉबी देओलच्या लूकवर चाहते घायाळ

या टीझरमध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना या सगळ्यांचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे.
Animal Teaser : 'अ‍ॅनिमल'चा जबरदस्त टीझर प्रेक्षकांच्या भेटीला ; बॉबी देओलच्या लूकवर चाहते घायाळ

अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून खूपचं चर्चेत आहे. रणबीरचा बहुचर्चित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर बघून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या टीझरमध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना या सगळ्यांचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे.

'अ‍ॅनिमल'च्या टीझरमध्ये भरपूर अॅक्शन पाहायला मिळत आहे. या टीझरच्या सुरुवातीला रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या चित्रपटात रणबीरच्या वडिलांची भूमिका अनिल कपूर यांनी साकारली आहे. या टीझऱमध्ये अनिल कपूर हे रणबीरला मारताना दिसत आहेत. यानंतर रणबीर कपूरची दाढी, मिशी आणि केस वाढलेला हटके लूक पाहायला मिळतो. तर या टीझरच्या शेवटी बॉबी देओलचा शर्टलेस लूक पाहायला मिळत आहे.

'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच हिंस्त्र पात्र साकारताना दिसत आहे. तर हा चित्रपट संदीप वांगा रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट याआधी ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. त्यानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाच्या तारीख पुढं ठकलण्याचा निर्णय घेतला. आता हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीसह तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेरसिक चा चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in