'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर; चाहत्याची आतुरता शिगेला

संदीप रेड्डी वंगा यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत तारीख जाहीर केली आहे
'अ‍ॅनिमल'च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर; चाहत्याची आतुरता शिगेला

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. रणबीरचा आगामी चित्रपटाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. प्रेक्षकवर्ग 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. रणबीरचा हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या ट्रेलरची रणबीर कपूरचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या मेकर्सनं या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे.

संदीप रेड्डी वंगा यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत तारीख जाहीर केली आहे. संदीप यांनी रणबीर कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर "23 नोव्हेंबरला ट्रेलर." असं लिहिलं आहे. रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा टीझर दुबईतील बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला होता .बुर्ज खलिफावर अ‍ॅनिमल चित्रपटाचा टीझर पाहण्यासाठी रणबीर कपूर आणि बॉबी देओल हे दुबईमध्ये पोहोचले होते. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा टीझर बुर्ज खलिफावर पाहून रणबीर आणि बॉबी आश्चर्यचकित झाले होते.

'अ‍ॅनिमल' या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी या कलाकारांच्या देखील महत्वाच्या भूमिका असतील. हा चित्रपट आधी 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता पण काही कारणांमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in