Animal Twitter Review 'अ‍ॅनिमल' चाहत्याच्या पसंतीस खरा उतरला? चाहत्यांनी शेअर केल्या भन्नाट प्रतिक्रिया

हा चित्रपट किती कमाई करतो याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.
Animal Twitter Review 'अ‍ॅनिमल' चाहत्याच्या पसंतीस खरा उतरला? चाहत्यांनी शेअर केल्या भन्नाट प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट आज रिलिज झाला असून या चित्रपटाचे पहाटे ६ वाजल्यापासून सगळीकडे शो लागले आहेत. रणबीरच्या या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून होती. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची चाहते फार आतुरतेने वाट पाहत होते आणि आज अखेर हा चित्रपट रिलीज झाला आहे.

आता प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मिडियावर आपली प्रतिक्रिया देण्यास सूरु केलं आहे. पहिल्याच दिवशी 'अ‍ॅनिमल' पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी चित्रपटगृहांमध्ये दिसत होती. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणाऱ्या लोकांनीही सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. आता अनेकांनी 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहिल्यानंतर रणबीरच्या अभिनयाचं फार कौतुक केल आहे. तर अनेकांना बॉबी देओलचा अभिनय खतरनाक वाटला आहे, असं लिहलं आहे.

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर निश्चितच धुराळा उडवणार आहे. नेटकरी या चित्रपटाचं फार कौतुक करत आहेत आणि चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. एका प्रेक्षकाने लिहिले आहे की, "हा उत्कृष्ट सिनेमा पाहणं चुकवू नका." तर दुसऱ्याने चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनचा स्क्रीनशॉट शेयर केला आणि लिहिले आहे की, "या लढाईच्या सीनने चित्रपटगृहामध्ये खळबळ उडवली आहे. इतर लोकांना काय वाटते ते सांगा,"

अजून एकानं लिहिले आहे की, 'चित्रपट तीन तासांपेक्षा जास्त असल्याने मला आश्चर्य वाटले होते की आपण एवढा वेळ बसू शकू का?.. चित्रपट कधी सुरू झाला.. तो कधी संपला हे मला कळालं देखील नाही.." याशिवाय आणखी एका व्यक्तीने ट्विट केलं आहे की, "हा पहिला बॉलीवूड पॅन इंडिया ब्लॉकबस्टर असेल.. कथा, पटकथा, संगीत, रणबीर कपूरचा अभिनय.. हे सर्व या चित्रपटाचे प्लस पॉइंट्स आहेत.. वजा करण्यासारखे काहीच कमी नाही.."

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असून सकाळचे सगळे शोही हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट किती कमाई करतो याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

logo
marathi.freepressjournal.in