पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी; अल्पवयीन आरोपीला अटक

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती देण्यात आली
पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी; अल्पवयीन आरोपीला अटक

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या महतीनुसार, मुंबई गुन्हे शाखेने शहापूरमधून एका १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून तो मुलाचा राजस्थानचा आहे. त्याच्यासोबत त्याच्या भावालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने असे का केले? याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण, काही दिवसांपूर्वी बिश्नोई गँगचा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत चांगलीच वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री मुंबई पोलीस कंट्रोलला रॉकी भाई या नावाने फोन आला. 'मी ३० तारखेला सलमान खानला मारणार आहे, त्याला सांगा.' असे म्हणत त्याने फोन ठेवून दिला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुंबई गुन्हे शाखेने या आरोपीचा शोध घेतला असून तो अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in