विराट बाद झाल्याने अनुष्का शर्मा ट्रोल; युजर म्हणाले, "अनुष्का मैदानात आली की..."

नेटकऱ्यांनी ओव्हल मैदावरील भारताच्या पराभवाला अनुष्काला कारणीभूत ठरवलं आहे.
विराट बाद झाल्याने अनुष्का शर्मा ट्रोल; युजर म्हणाले, "अनुष्का मैदानात आली की..."

'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यात इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात भारताचा 209 धावांनी परभव करत ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक आपल्या नावे केला. या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरताना दिसले. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला देखील या सामन्यात पाहिजे तशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या डावात विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, तो 49 धावांवर माघारी परतला. यावेळी ओव्हल मैदानावर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती.

विराट बाद झाल्यानंतर अनुष्का शर्मा नाराज झाली. तिची नाराज झाल्याची रिअॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी अनुष्काला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी ओव्हल मैदावरील भारताच्या पराभवाला अनुष्काला कारणीभूत ठरवलं आहे. एका युजरने ट्विट केलं आहे की, आतापर्यंत अनुष्का जेव्हा स्टेडियममध्ये आली. तेव्हा भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही," तर दुसऱ्या युजरने "अनुष्का भारतीय संघासाठी पनौती आहे," असं म्हटलं आहे. एका युजरने तर मी विराटचा चाहता आहे, पण मी एवढे दिवस पाहतोय, "अनुष्का स्टेडियममध्ये आली की, विराट नीट खेळत नाही, भारत देखील सामना जिंकत नाही. कृपया तू मॅच बघायला येत जाऊ नकोस." यावर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या काही चाहत्यांनी अनुष्काला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. "आता तरी तुमची मानसिकता बदला, यात अनुष्काची काय चूक?" असा सवाल देखील केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in