'या' जवळच्या व्यक्तीला गमावल्याने अपूर्वा नेमळेकर दुःखात

अपूर्वा नेमळेकरने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने त्याच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले
'या' जवळच्या व्यक्तीला गमावल्याने अपूर्वा नेमळेकर दुःखात

अपूर्वा नेमळेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनमध्ये ती रनर अप होती. अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. अपूर्वा नेमळेकरच्या भावाचे निधन झाल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. यावेळी तिने एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अपूर्वा नेमळेकरने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने त्याच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यासोबतच तिने एक भावनिक पोस्ट शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. अपूर्वा नेमळेकरच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in