अर्पिता खानच्या घरी चोरी करणार्‍यास अटक

सोमवारी दुपारी दोन तिने बाथरुमच्या मेकअप ट्रेमध्ये पाच लाखांची हिरेजडीत कानातील रिंग ठेवली होती
अर्पिता खानच्या घरी चोरी करणार्‍यास अटक

सिनेअभिनेता सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी करणार्‍या नोकराला गुन्हा दाखल होताच काही तासांत खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. संदीप हेडगे असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची पाच लाखांची हिरेजडीत सोन्याची कानातील रिंग हस्तगत केली आहे. अर्पिता खान ही सलमान खानची बहिण असून ती खार येथील सतरावा रोड, सदगुरु फ्लाईंग कॉर्पेट इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ४०१ मध्ये राहते. तिच्याकडे संदीप हा घरगडी म्हणून कामाला होता. सोमवारी दुपारी दोन तिने बाथरुमच्या मेकअप ट्रेमध्ये पाच लाखांची हिरेजडीत कानातील रिंग ठेवली होती. मंगळवारी दुपारी तीन वाजता तिने ट्रेमधून रिंग पाहिली असता त्यात रिंग नव्हती. चोरीचा हा प्रकार निदर्शनास येताच तिने सर्व नोकराची चौकशी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in