फक्त 99 रुपयांमध्ये पाहा आर्टिकल 370' हा चित्रपट; जाणून घ्या कसे अन् कधी मिळणार तिकीट

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा बहुप्रतिक्षित 'आर्टिकल 370' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
फक्त 99 रुपयांमध्ये पाहा आर्टिकल 370' हा चित्रपट; जाणून घ्या कसे अन् कधी मिळणार तिकीट

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा बहुप्रतिक्षित 'आर्टिकल 370' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरवर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटाबाबत आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना मोठी भेट दिली आहे. या चित्रपटाचे तिकीट फक्त 99 रुपयांना मिळणार आहे.

पहिल्याच दिवशी 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहा -

'आर्टिकल 370'च्या निर्मात्यांनी रिलीजच्या पहिल्याच दिवशी खास ऑफर लाँच केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी तुम्ही 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकणार आहात. आदित्य जांभळेने दिग्दर्शित केलेला चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'आर्टिकल 370' मध्ये यामी गौतम ही एनआयए अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटातील पात्राचे प्रेक्षकांकडून कौतुक-

आदित्य धर यांनी 'आर्टिकल 370' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. प्रियामणि, वैभव तत्ववादी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी आपल्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काश्मीरमध्ये रिलीज होणार नाही-

संवेदनशील मुद्यावर भाष्य करणाऱ्या 'आर्टिकल 370' या चित्रपटाबद्दल रिलीज आधीच मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. यामी गौतमच्या या चित्रपटात जम्मू- काश्मिर राज्यासाठी संविधानातील अनुच्छेद 370 हटवण्याबाबतची गोष्ट दाखवली जाणार आहे. हा चित्रपट काश्मिरमध्ये प्रदर्शित होणार नाही. याबद्दल निर्माता आदित्य धर यांनी सांगितले की, आम्ही आधी हा चित्रपट काश्मिरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार केला होता. मात्र, सध्या यामी गरोदर असल्याने तिला अधिक प्रवास करायचा नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in