'असुर'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जिओने येणाऱ्या अनेक सिनेमे आणि वेबसीरिजबद्दल एका व्हिडिओतून माहिती दिली आहे. त्यात 'असुर' 2 चा देखील समावेश आहे.
'असुर'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कोविडमुळे संपुर्ण जग बंदिस्त झाले होते. याचा परिणाम कमी अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रांवर झाला. सिनेसृष्टीलादेखील याचा मोठा फटका बसला. या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळाले. लॉक डाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर असलेल्या 'असुर' या वेबसीरिजची चांगलीच चर्चा रंगली होती. सुरुवातीला या सीरिजला मिळणारा प्रतिसाद हा थंड होता. नंतर मात्र या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

तोवर सायको थ्रिलर असणारी या प्रकारची कथा कुणीही पाहिली नव्हती. सीरिज प्रंचड गाजल्यानंतर चाहते तिच्या पुढच्या सीझनची वाट पाहत होते. या सीरिजमध्ये काम करणाऱ्या अर्शद वारसी आणि बरुण सोबती या दोन्ही कलाकारांच्या कामाची प्रचंड प्रशंसा झाली. आता प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. 'असुर'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री रिद्दी डोग्रा हिने मध्यंतरी या सीरिजबद्दल भाष्य केले होते. 'असुर'चा पहिला सीझन हा 'वुट' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र आता सीझन 'जियो सिनेमा' वर प्रदर्शित होणार आहे. जिओने येणाऱ्या अनेक सिनेमे आणि वेबसीरिजबद्दल एका व्हिडिओतून माहिती दिली आहे. त्यात 'असुर' 2 चा देखील समावेश आहे.


'असुर'चा अद्याप टीझर तसेच ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही. त्याच्या प्रदर्शित होण्याची तारीख देखील कळवण्यात आलेली नाही. मात्र जिओने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये 'असुर' 2 ची झलक पाहायला मिळाली आहे. हा सीझन जून 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेता अर्शद वारसीने या सीझनमधील नव्या आव्हानांसाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. वरुण सोबती, अर्शद वारसी, अनुप्रिया गोएंका आणि रिद्दी डोग्रा हे कलाकार या सीरीजमध्ये मुख्य भूमीकेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in