अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेला हा अभिनेता न्याय देणार का?

चित्रपटाचे काम जोरदार सुरु, टीम लखनौ मध्ये
अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेला हा अभिनेता न्याय देणार का?

अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकीय आणि वैयक्तिक कारकिर्दीवर आधारित एक मोठा चित्रपट येत्या काही काळात आपल्या भेटीला येणार आहे. 'मैं अटल हूं' या चित्रपटात अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिरेखेत गुणी अभिनेता पंकज त्रिपाठी दिसेल. तर दिग्दर्शन आहे रवी जाधव यांचं. सलीम सुलेमान यांचं संगीत असून गीतकार आहेत मनोज मुंतशीर.

या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून दुसरं शेड्युल लखनौ मध्ये पार पडणार आहे. १६ दिवस लखनौमध्ये शूटिंग होईल. चित्रपटाची टीम सध्या लखनौमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. यावेळचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत शोभून दिसतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. मुळात पंकज त्रिपाठी यांचं हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांनी अनेक आव्हानात्मक भूमिका याआधी केल्या आहेत. त्यामुळे ते वाजपेयींच्या भूमिकेला न्याय देतील अशी चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in