'अवतार ३' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; लवकरचं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी या चित्रपटाच्या रिलीजबद्दल भाष्य केलं आहे.
'अवतार ३' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर;  लवकरचं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'अवतार' आणि 'अवतार: द वे ऑफ वॉटर' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांना 'अवतार ३' या चित्रपटाची उसुक्ता लागली होती. या चित्रपटासाठी चाहतेवर्ग खुपचं उत्सुक असून अखेर 'अवतार ३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अवतार ३' या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सध्या या चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी या चित्रपटाच्या रिलीजबद्दल भाष्य केलं आहे. 'अवतार 3' हा चित्रपट खूपच खास असणार आहे.

'टीव्ही न्यूझीलँड'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेम्स कॅमेरॉन म्हणले आहेत की, "प्रोस्ट प्रोडक्शनच्या कामात आम्ही दोन वर्ष खूप व्यस्त आहोत. त्यामुळे 'अवतार ३' हा चित्रपट 2025 च्या नाताळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच नव्या कलाकृतींवर काम सुरू करू तसंच न्यूझीलँडचं नागरिक होण्याचा विचार करत असल्याचंही ते म्हणाले आहेत". 'अवतार ३' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

'अवतार 2' हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषेत देखील पाहू शकतात. या चित्रपटाचा तिसरा भाग 19 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यानंतर 21 डिसेंबर 2029 रोजी या चित्रपटाचा चौथा भाग प्रदर्शित होईल. तर 19 डिसेंबर 2031 मध्ये या चित्रपटाचा पाचवा भाग प्रदर्शित होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in