'कुत्ते' चित्रपटातील पहिले गाणे 'आवारा डॉग्स' झाले प्रदर्शित

गुलजारच्या लिरिक्ससह, गाण्यातील शब्द चित्रपट आणि त्यातील पात्रांचे अचूक वर्णन करतात
'कुत्ते' चित्रपटातील पहिले गाणे 'आवारा डॉग्स' झाले प्रदर्शित

अर्जुन कपूर आणि तब्बू अभिनीत 'कुत्ते'या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र होत आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला ज्याला प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. अशातच, आता 'कुत्ते'या चित्रपटातील पहिले गाणे "आवारा डॉग्स" रिलीज झाले असून चित्रपट निर्माता-संगीतकार विशाल भारद्वाज यांच्या विशाल संग्रहातील हे गाणे चार्टबस्टर ठरणार आहे.

गुलजारच्या लिरिक्ससह, गाण्यातील शब्द चित्रपट आणि त्यातील पात्रांचे अचूक वर्णन करतात. तसेच, विशाल भारद्वाज यांच्या संगीतासाठी गुलजार यांनी नेहमीच काही अप्रतिम गाणी लिहिली आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीने काही उत्कृष्ट गाणी तयार केली आहेत जी चार्टबस्टर ठरली असून दर्शकांना आजही आवडतात. अशातच, आता सर्वांच्या नजरा चित्रपटातील इतर गाण्यांकडे लागल्या आहेत.

विशाल भारद्वाज आणि देबर्पितो साहा यांच्या कोरससह हे गाणे विशाल ददलानी यांनी गायले आहे. अशातच, 'आवारा डॉग्स' आता लोकांवर आपली जादू चालवण्यासाठी सज्ज आहे. तसेच, विजय गांगुलीने कोरिओग्राफी करत या गाण्याला चार चांद लावले आहेत. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, 'कुत्ते'हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज देणार असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. 'कुत्ते'हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in