आमदार बच्चू कडूंचा शिव ठाकरेला पाठिंबा; जुना फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

बिग बॉस हिंदीच्या १६व्या पर्वात मराठी अभिनेता शिव ठाकरेने अंतिम फेरीत स्थान मिळवले असून महाराष्ट्राभरातून त्याला पसंती मिळतेय
आमदार बच्चू कडूंचा शिव ठाकरेला पाठिंबा; जुना फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
Published on

बिग बॉस हिंदीचे १६वे पर्व आता अंतिम टप्प्यात आले असून १२ फेब्रुवारीला या पर्वाचा विजेता ठरणार आहे. अशामध्ये अंतिम सदस्यांमध्ये मराठी अभिनेता शिव ठाकरेने स्थान मिळवले असून सर्वाधिक पसंती त्याला मिळत आहे. आता त्याला आमदार बच्चू कडूंनीही पाठिंबा दर्शवला आहे. ते फेसबुकवर एक पोस्ट म्हणाले की, "अतिशय सामान्य कुटूंबातून अमरावती येथील शिव ठाकरे, बिग बॉस हिंदीच्या अंतिमपर्यंत पोहोचला आहे. त्याला वोट करा" असे म्हंटले आहे. याचसोबत त्याचा एक जुना फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

मराठी अभिनेता शिव ठाकरेने त्याच्या दिलखुलास स्वभावाने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली आहेत. अंतिम सदस्यांमध्ये स्थान मिळवणारा शिव हा विजेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. यापूर्वी शिव ठाकरे हा मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. तसेच, त्याला अमृता फडणवीस यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता शिव ठाकरे बिग बॉस हिंदीचे हे पर्व जिंकतो का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in