बाईपण बॅाक्सॲाफिसवर 'भारी'

बाईपण भारी देवा चित्रपटाने एका दिवसात जमवला एवढा गल्ला
बाईपण बॅाक्सॲाफिसवर 'भारी'

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाने सध्या महाराष्ट्रात बॅाक्सॲाफिसवर धुमाकूळ घातला आहे. ३० जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दिपा परब या सर्व अभिनेत्रींचा दमदार अभिनय आणि उत्तम कथानक, स्रियांच्या मनाला भिडणारी गोष्ट या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

बॅाक्सॲाफ्सवर चित्रपटाने दुस-या आठवड्याअखेर १३. ५० कोटींची कमाई केली होती, तर दहाव्या दिवशी तब्बल २६.१९ कोटींची कमाई केली आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटाला बायकांनी जास्त गर्दी केली असून माऊथ पब्लिसिटीचा फायदा निर्मात्यांना झाला आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटाने नवा इतिहासदेखील केला आहे.' बाईपण भारी देवा' या चित्रपटाने फक्त एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई केली आहे. हा आकडा मराठी चित्रपटांच्या दृष्टिने खूप मोठा आहे. अशीच घोडदौड मराठी चित्रपटाच्या बॉक्सऑफिसची सुरु राहीली तर येत्या काळात मराठी चित्रपटाला आणखी चांगले दिवस येतील.

logo
marathi.freepressjournal.in