MC Stan Concert : एमसी स्टॅनच्या शो मध्ये करणी सेनाची एंट्री ; असा घातला गोंधळ, पाहा व्हिडिओ

स्टॅन आपल्या गाण्यांमधून ड्रग्जसारख्या गोष्टींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही करणी सेनाने केला
MC Stan Concert : एमसी स्टॅनच्या शो मध्ये करणी सेनाची एंट्री ; असा घातला गोंधळ, पाहा व्हिडिओ

'बिग बॉस 16' चे विजेतेपद जिंकल्यापासूनच एमसी स्टॅन चर्चेत आहे. बिग बॉसमुळे स्टॅनचा चाहता वर्ग कमालीचा वाढला आहे. स्टॅनने त्याच्या चाहत्यांसाठी देशभर कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले आहेत. 17 मार्च रोजी इंदूरमध्ये स्टेनच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कॉन्सर्ट सुरू असताना करणी सेनाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून ती बंद पाडल्याचे समोर आले आहे. करणी सेनाने रॅपर एमसी स्टॅनच्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. करणी सेनाच्या कार्यकर्त्यांनी रॅपमध्ये महिलांबाबत केलेल्या गैरवर्तन आणि वक्तव्याला विरोध केला आहे.

स्टॅन आपल्या गाण्यांमधून ड्रग्जसारख्या गोष्टींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही करणी सेनाने केला आहे. देशातील तरुण पिढीला वाईट मार्गावर जाण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे ते म्हणतात. इंदूरमधील स्टॅनच्या कॉन्सर्टचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये स्टॅनच्या कॉन्सर्टदरम्यान करणी सेनाचे कार्यकर्ते स्टेजवर बोलताना दिसत आहेत. इंदूरमधील स्टॅनचा कॉन्सर्ट करणी सेनाच्या कार्यकर्त्यांनी रद्द केल्यानंतर 'स्टँड विथ एमसी स्टॅन' हा हॅशटॅग त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर ट्रेंड केला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर स्टेनच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in