लवकरच मोठ्या पडद्यावर येणार 'बाल शिवाजी'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त पहिलं पोस्टर प्रदर्शित
लवकरच मोठ्या पडद्यावर येणार 'बाल शिवाजी'
Published on

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त 'बाल शिवाजी' चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. 'सैराट' फेम अभिनेता आकाश ठोसर या चित्रपटात बाल शिवाजीच्या भूमिकेत दिसेल.

'बाल शिवाजी' या चित्रपटात शिवरायांचा वयवर्षं १२ ते १६ पर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी पाहायला मिळतील.रवी जाधव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. 'बाल शिवाजी' हा चित्रपट बिग बजेटमध्ये बनवण्यात येणार असं कळतंय.

दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, “माझा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे आई-वडील, जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी त्यांचा भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवेल तसेच लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कौशल्ये कशी तीक्ष्ण झाली हे दाखवेल. मी गेली नऊ वर्ष या स्क्रिप्टवर काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपट करणार आहे. चित्रपटाची कथा संदीप सिंग यांनी समजून घेतली. मुख्य भूमिकेसाठी आकाश ठोसरची आम्ही एकमताने निवड केली. तरुण राजाची भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडे राजसी रूप आणि व्यक्तिमत्त्व आहे. या भूमिकेसाठी त्याचा उत्साह आणि उत्सुकता पाहून मी प्रभावित झालो आहे.”

'बाल शिवाजी' चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग, सॅम खान, रवी जाधव, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि अभिषेक व्यास यांनी केली आहे. लिजेंड स्टुडिओ, एव्हीएस स्टुडिओ आणि रवी जाधव फिल्म्स यांच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'बाल शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असून चिन्मय मांडलेकर आणि रवी जाधव यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण वर्षाअखेरीस सुरू होईल.

logo
marathi.freepressjournal.in