वरुण धवन - जान्हवी कपूरचा 'बवाल' होणार या तारखेला प्रदर्शित

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनीत 'बवाल' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्कंठा
वरुण धवन - जान्हवी कपूरचा 'बवाल' होणार या तारखेला प्रदर्शित

वरुण धवन आणि जान्हवी कपूर अभिनीत 'बवाल'या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढत आहे. 'छिछोरे' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या यशानंतर साजिद नाडियाडवाला आणि नितेश तिवारी या चित्रपट निर्मात्यांचा हा आगामी प्रोजेक्ट आहे. अशातच, 'बवाल' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत असतानाच, निर्मात्यांनी अखेरीस या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट पुरस्कार विजेती निर्माता-दिग्दर्शक जोडी या सिनेमासाठी एकत्र आली आहे. तसेच, यामध्ये वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. अशातच, ६ ऑक्टोबर २०२३ रोजी 'बवाल' हा चित्रपट दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसनच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला यांनी 'बवाल'ची निर्मिती केली असून, अर्थस्काय पिक्चर्सने याची सह-निर्मिती केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in