'मला तुझा खूप अभिमान, आजपर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स'; कतरिनाच्या "मेरी ख्रिसमस"चं विक्कीकडून कौतुक

अभिनेता विक्की कौशल याने कतरिनाच्या अभिनयाचे तोंडभरुन कौतुक करत तुझे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम असल्याचे म्हटले आहे.
'मला तुझा खूप अभिमान, आजपर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स'; कतरिनाच्या "मेरी ख्रिसमस"चं विक्कीकडून कौतुक

बॉलिवूडचा या वर्षातला पहीला आणि बहुप्रतिक्षित चित्रपट "मेरी ख्रिसमस" अखेर आज (शुक्रवारी,१२) सिनेमा घरांत प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून यातील कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. अशात, कतरिनाचा पती आणि अभिनेता विक्की कौशल यानेही कतरिनाच्या अभिनयाचे तोंडभरुन कौतुक करत तुझे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम असल्याचे म्हटले आहे. विक्कीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये विजय सेतुपतीचेही कौतुक केले.

मला तुझा अभिमान वाटतो -

“मला तुझा खूप अभिमान वाटतोय लव्ह. किती सुंदरपणे तू स्वत:ला श्रीराम सरांच्या उत्कृष्ट स्टोरीटेलिंग आणि ‘मारिया’च्या पात्रात झोकून दिलं आहेस…तिची जादू, तिचं गूढ...सर्व काही प्रामाणिकपणे आणि बारकाईने पडद्यावर दाखवलंस! आणि तो डान्स…उफ्फ! हे खरोखर तुझे आजपर्यंतचे सर्वोत्तम काम आहे,” अशी पोस्ट विकीने कतरिनासाठी केली आहे. याशिवाय, विजय सर तुम्ही तुमच्या पात्रांमध्ये लहान मुलासारखा निरागसपणा कसा आणता हे माहित नाही पण तुम्हाला अल्बर्टची भूमिका करताना पाहण्यात पाहण्यात निव्वळ आनंद आहे, असेही विक्कीने लिहिले.

चाहतेही झाले फिदा -

सोशल मीडियावरही चाहते कतरीनाचं कौतुक करत असून तिचा आजपर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स असल्याचं म्हंणत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी 'अंधाधुन'सारखे हिट चित्रपट दिले आहेत. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सस्पेन्स चित्रपट आहे. विजय सेतुपती, कतरिना कैफ, विनय पाठक व संजय कपूर यांनी उत्तम काम केलं आहे, असा रिव्ह्यू समीक्षण तरण आदर्श यांनी दिला आहे. या चित्रपटाला त्यांनी पाचपैकी साडेतीन स्टार दिले आहेत.

कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती यांची चित्रपटात मुख्य भूमिका आहे.ना कैफ, विनय पाठक व संजय कपूर यांनी उत्तम काम केलं आहे, असा रिव्ह्यू समीक्षण तरण आदर्श यांनी दिला आहे. तर या चित्रपटाला त्यांनी 3.½ स्टार दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in