
दोन वर्षांनंतर लाल किल्ला, दिल्ली येथील प्रसिद्ध लव-कुश रामलीला जल्लोषात व उत्साहात परतली आहे. आणि या भव्य साजरीकरणामध्ये भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय जोडी एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) व अनिता मिश्रा (विदिशा श्रीवास्तव) सामील झाले. दिल्लीवाल्यांचे उत्स्फूर्त स्वागत व उच्च उत्साह, हिंदू महाकाव्य रामायणचे सुंदर सादरीकरण, दसऱ्याच्या पूर्वार्धात केलेली सजावट आणि उपस्थित जनसमुदायासह लक्षवेधक असलेल्या या कार्यक्रमाबाबत या कलाकारांनी त्यांचे मते व्यक्त केली.
आपला उत्साह व्यक्त करत आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्हणाले, ‘’लाल किल्ला येथील रामलीलामध्ये उपस्थित जनसमुदाय पाहून अत्यंत अद्भुत वाटले. आम्हाला हाक मारण्यासह आमचा उत्साह वाढवताना त्यांची आपुलकी व उच्च उत्साह दिसून आला. लव-कुश रामलीला सर्वात लोकप्रिय साजरीकरण आहे आणि देशभरातून लाखो लोक येथे उपस्थिती दाखवतात. यंदाचे साजरीकरण नव्या उंचीवर पोहोचले आणि संस्मरणीय ठरले. दोन वर्षांनंतर त्यांची लोकप्रिय रामलीला परतल्यामुळे सर्वांसाठी हा क्षण अधिक खास ठरला. निश्चितच हा संपूर्ण अनुभव उत्साहपूर्ण होता. बालपणी मी अनेकवेळा माझ्या कुटुंबासोबत येथे रामलीला पाहायला आलो. पण एकेदिवशी या मंचावर उभे राहून जनसमुदायासोबत माझी मालिका व भूमिकेबाबत संवाद साधत असेन असे कधीच वाटले नाही. कलाकार म्हणून ही माझी दुसरी भेट आहे. २०१९ मध्ये मी माझा सह-कलाकार रोहिताश्व (तिवारी जी) सोबत येथे आलो होतो आणि आम्ही तेव्हा जनसमुदायासोबत धमाल संवाद साधला होता. या भव्य साजरीकरणामध्ये सहभाग घेण्याची आणि भव्य-दिव्य सादरीकरण पाहण्याची ही अद्भुत संधी देण्यासाठी आम्ही संपूर्ण आयोजन समितीचे आभार मानतो. ‘दिल्लीवाल्यांनी पुन्हा एकदा माझे मन जिंकले’ विदिशा आणि मी दिल्लीमधील काही ठिकाणी देखील फेरफटका मारायला गेलो आणि शहरातील स्वादिष्ट पाककलांचा छान आस्वाद घेतला. मी सुरेख कलाकृतीच्या आठवणी, मनाला स्पर्श केलेला गेस्चर आणि मन तृप्त करणाऱ्या पाककलांचा आस्वाद अशा आठवणी माझ्यासोबत घेऊन जात आहे.’’ लाल किल्ला येथे रामलीला साजरीकरणामध्ये पहिल्यांदाच भेट देण्याबाबत विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाभी म्हणाल्या, ‘’हा सर्वात भव्य कार्यक्रम होता, ज्यामधून अद्भुत अनुभव मिळाला. मी लव-कुश रामलीलाबाबत भरपूर काही ऐकले होते, ज्यामुळे माझी येथे जाण्याची इच्छा होती. उपस्थित जनसमुदाय अद्भुत होता आणि त्यांनी आमच्यावर त्यांचे प्रेम व आपुलकीचा वर्षाव केला. रामलीला हा भव्य कार्यक्रम आहे आणि अशा भव्य सादरीकरणाला पाहण्याचा अनुभव सुरेख व संस्मरणीय होता. यामधील सर्वात उत्साहपूर्ण क्षण म्हणजे मंचावर आसिफजी व उपस्थित जनसमुदायसोबत धमाल संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांचा उत्साह व जोश सर्वोत्तम होता, ज्यांनी मला अनिता भाभी म्हणून हाक मारली. हा क्षण माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी स्मरणात राहिल. दिल्ली हे माझ्या आवडत्या शहरांपैकी एक आहे आणि मला येथे शॉपिंग करायला व खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडते. पण यावेळी भव्य साजरीकरण पाहून ही भेट अधिक संस्मरणीय ठरली. मला येथे अजून यायला आवडेल."