
भुसावळमध्ये स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे २ दिवसीय राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या 'स्नेहयात्री करंडक एकांकिका स्पर्धे'त एकापेक्षा एक उत्तम एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मुंबईच्या 'कलासक्त' या संस्थेच्या 'ओल्या भिंती' या एकांकिकेला प्रथम पारितोषिक देण्यात आले. तर, नाशिकच्या स्मिता हिरे महाविद्यालयाने सादर केलेल्या 'हार्ले क्विन' या एकांकिकेला द्वितीय आणि जळगावच्या नाट्यरंग थिएटरच्या 'दान पावलं' या एकांकिकेला तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. तसेच, मुंबईच्या डावा क्रिएशन्सने सादर केलेल्या 'मेन इन ब्लॅक' या एकांकिकेने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
दिग्दर्शन- योगेश कदम (प्रथम), रोहित सरोदे / सतीश वराडे (व्दितीय), अमोल ठाकूर (तृतीय)
अभिनय- सतीश वराडे (प्रथम), अमोल ठाकूर (व्दितीय), अनिकेत ठाकूर (तृतीय)
स्त्री अभिनय - राजश्री जमदाडे (प्रथम), डॉ. जुईली टेमकर (व्दितीय), पायल जाधव (तृतीय)
नेपथ्य - आशिष पवार (प्रथम), विनय गोडे (व्दितीय), प्रथमेश पाटील / अविनाशसांबर (तृतीय)
प्रकाशयोजना - श्याम चव्हाण (प्रथम), प्रणव सपकाळे (द्वितीय), नितीन सावळे (तृतीय)