"पिच्चर तसा बरा हाय पण..." नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदुक बिरयानी’बाबत किरण मानेंची खास पोस्ट

नागराज मंजुळे अभिनित 'घर, बंदूक, बिरयाणी' याला मराठी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून बिग बॉस फेम किरण मानेंनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या
"पिच्चर तसा बरा हाय पण..." नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदुक बिरयानी’बाबत किरण मानेंची खास पोस्ट

काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असलेला 'घर, बंदूक बिरयाणी' राज्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत अवताडे यांनी केलेले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर आता बिग बॉस फेम किरण माने यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त करत एक फेसबुक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी नागराज मंजुळेंच्या अभिनयाची तारीफ तर केलीच, शिवाय चित्रपटाला ट्रोल करणाऱ्यांना आरसादेखील दाखवला आहे.

फेसबुक पोस्टमध्ये किरण माने म्हणाले की, " चित्रपट तसा बरा आहे, एवढापण वाईट नाही. मी काही प्रमाणात एंजॉयपण केला. सोशल मिडीयावर आण्णाला (नागराज मंजुळे) ट्रोल करणार्‍यांनी आणि त्याच्या खुशमस्कऱ्यांनी दोघांनीही वात आणला होता. आण्णाला टॅग करून ओढूनताणून चित्रपटामधले सिंबॉलिजम आणि नको ते अन्वयार्थ काढून भरभरुन परीक्षणे लिहिनाऱ्यांचा उत आला होता. दुसर्‍या बाजूला नावे ठेवनाऱ्यांना पण खूपच चित्रपट असल्यासारखे सरसकट ठेचायला सुरवात केली होती. अधलीमधली काय भानगडच नव्हती. या गदारोळात कुठलाच पूर्वग्रह नको, म्हणून चित्रपट थोडा उशीराच बघायचा ठरवला. पण मला हा चित्रपट एवढाही वाईट वाटला नाही." असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in