Big Boss : सलमान खानमुळे 'बिग बॉस'ने टीआरपी चार्ट्सवर केला बोलबाला

ऑक्टोबरपासून सुरू झालेला 'बिग बॉस १६' (Big Boss) यावेळी टीआरपी यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला
Big Boss : सलमान खानमुळे 'बिग बॉस'ने टीआरपी चार्ट्सवर केला बोलबाला

भारतातील सर्वात लोकप्रिय नॉन-फिक्शन टेलिव्हिजन रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'ने (Big Boss) स्वतःचे एक स्थान बनवत देशभरात एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. तसेच, या शोचा १६वा सीझन चालू असून सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) होस्ट म्हणून सामील झाल्यापासून शोच्या टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स)मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अशातच, सलमान खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि या सुपरस्टारला पाहण्यासाठी दर्शक नेहमीच उत्सुक असतात यात शंका नाही.

'बिग बॉस'चा १६वा सीझन चालू आहे या शोची वाढती लोकप्रियता आणि प्रेक्षकसंख्या पाहून या शोच्या यशाचा अंदाज लावला जाऊ शकतो. याचे कारण देखील स्पष्ट आहे, सलमान खानने आपल्या स्टारडमची ताकद सिद्ध केली असून हा शो सतत प्रेक्षकांना आकर्षित करत चार्टच्या शीर्षस्थानी पोहोचला आहे. तसेच, सलमान खानने होस्ट म्हणून कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून हा पूर्णपणे समलानचा शो झाला आहे.

अशातच, आश्चर्याची बाब ही आहे जिथे बहुतेक टेलिव्हिजन टीआरपी होल्डर्स डेली सोप आहेत, तिथेच 'बिग बॉस' हा नॉन-फिक्शन टेलिव्हिजन रिअ‍ॅलिटी शो आहे. या शोने स्वतःला सिद्ध करत या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच, १ ऑक्टोबरपासून सुरू झालेला 'बिग बॉस १६' यावेळी टीआरपी यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या शोने सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेक होस्ट पाहिले असताना, होस्ट म्हणून सलमान खानच्या एंट्रीने टीआरपीला एका नव्या स्तरावर नेले आहे. त्याचा करिष्मा आणि आकर्षणामुळेच हा शो प्रत्येक घराघरात सर्वात प्रिय बनला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in