'द केरला स्टोरी' बद्दल मोठी माहिती समोर; निर्मात्यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती

'आर्ष विद्या आश्रम' ज्या ठिकाणी धर्म परिवर्तनातून वाचलेल्या मुलींची काळजी घेतली जाते. त्या आश्रमाला शाह यांच्याकडून 51 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
'द केरला स्टोरी' बद्दल मोठी माहिती समोर; निर्मात्यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती

रिलीज होण्यापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे दिसूत येत आहे. या चित्रपटाने अनेकांची मने जिंकली आहेत, तर काही जणांकडून या चित्रपटावर टीका केली जात आहे. अनेकांनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याचे देखील म्हटले आहे. 'द केरला स्टोरी' या सिनेमाच्या निर्मात्यांनी एका पत्रकार परिषदेत या चित्रपटावर भाष्य केले आहे. तसेच चित्रपटाच्या यशानंतर ते लाखो रुपये डोनेट करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलत असताना चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह म्हणाले की, "अनेकांनी या चित्रपाटावर टीका केली आहे. चित्रपट खोटा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. निर्माते देखील खोट बोलत आहेत असे त्यांना वाटते. मात्र, हा चित्रपट फक्त तीन मुलींच्या कथेपेक्षा मोठा आहे", असे त्यांनी म्हटले आहे.

शाह यांनी चित्रपटाच्या यशानंतर लाखो रुपये डोनेट करण्याचा निर्धार केला आहे. 'आर्ष विद्या आश्रम' ज्या ठिकाणी धर्म परिवर्तनातून वाचलेल्या मुलींची काळजी घेतली जाते. त्या आश्रमाला शाह यांच्याकडून 51 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच शाह यांनी या आश्रमात असलेल्या 26 मुलींना सिनेमातील कलाकरांसोबत मीडियाशी संवाद साधायला बोलावले होते.

काय आहे सिनेमा? का होतोय वाद?

'द केरला स्टोरी' या सिनेमात मुलींचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करुन त्यांना कशाप्रकारे आयएसआयएसमध्ये भर्ती केले जाते हे दाखवले आहे. अनेकांनी या चित्रपटावर टीका केली आहे. केरळ सरकारने या चित्रपटावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने अशी बंदी आणता येणार नसल्याचे सांगितल्याने केरळ सरकारने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने या चित्रपटावर बंदी आणली होती, मात्र, न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. तामिळनाडूमध्ये देखील या चित्रपटावर अप्रत्यक्षरित्या बंदी आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, चित्रपटावर अशाप्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्क्षरित्या बंदी आणता येणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखणे हे सरकारचे काम असल्याचे सांगत न्यायालयाने त्यांचे कान टोचले.

'द केरला स्टोरी' हा सिनेमा देशभरातील 1300 स्क्रिनवर रिलीज झाला आहे. हा चित्रपटाने आतापर्यंत कोट्यावधींची कमाई केली असून चित्रपट आता 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले जात आहेत. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे खास शो आयजीत केले जात आहेत. काही ठिकाणी तर चित्रपटाच्या टिकीटांचे मोफत वाटप केले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in