ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या 'बिग बॉस' फेम अभिनेत्याची दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटका

एनसीबीने एजाज खानला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे अल्प्राझोलम या औषधाच्या 31 गोळ्या सापडल्या होत्या.
ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या 'बिग बॉस' फेम अभिनेत्याची दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटकाबिग बॉस या शोमधून अनेक व्यक्ती प्रकाशात झोतात असतात. तसेच ते त्यांच्या खासगी आणि सार्वजनिक जीवनामुळे देखील चर्चेत असतात. बिग बॉस 7 मधील एक पात्र नेकमीच चर्चेत राहीले आहे. त्याचा "एक नंबर..." हा डायलॉग सुद्धा खुप प्रसिद्द झाला. अभिनेता एजाज खानला सलमान खानच्या बिग बॉस 7 या शो मुळे चांगली प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, त्यानंतर घडलेल्या ड्रग्ज प्रकरणामुळे एजाजच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती. एनसीबीने एजाज खानला मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे अल्प्राझोलम या औषधाच्या 31 गोळ्या सापडल्या होत्या.

एजाजकडे सापडलेल्या ड्रग्जचे वजन 4.5 ग्रॅम येवढे होते. यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. एजाज हा तब्बल दोन वर्षापासून मुंबईच्या आर्थर रोज तुरुंगात बंद होता. एनसीबीने त्यांच्यावर ड्रग्ज तस्कर शादाब बटाटा यांच्याशी संबंध असल्याचा दावा केला होता. एजाजाकडे फक्त ड्रग्ज आढळून नाही आले. तर तो ड्रग्ज सेवनही करतो, असे आरोप एनसीबीने कोर्टाकडून करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षापासून त्याचे कुटुंब त्याच्या जामीनासाठी प्रयन्त केले होते. त्यासाठी ते वारंवार याचिका दाखल करत होते. 2022 मध्ये न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आखीर एजाजला आज दिलासा मिळाला आहे. आज संध्याकाळी 6:40 वाजता त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in